बाभुळसर बुद्रुक येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा उत्सव साजरा; स्वच्छता मोहिम व चावडी वाचन कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला
प्रतिनिधी : अल्लाउद्दीन अलवी | बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे | दिनांक : १ मे २०२५
बाभुळसर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजपूजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे यांनी भूषवले. त्यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. संत तुकाराम सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोहर मचाले यांनी ध्वजास श्रीफळ अर्पण करून ध्वजपूजन केले, तर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पूजन विधी पार पडले.
उपस्थित मान्यवरांमध्ये भरतभाऊ नागवडे (माजी चेअरमन, बाभुळसर विकास सहकारी संस्था), मा. सरपंच गणेश मचाले, माजी उपसरपंच सुनील देशवंत, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नागवडे, पोलिस पाटील मीना पाडळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष काका नागवडे, विनायक दूध संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वाल्मिक नागवडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष महेंद्र तात्या नागवडे, शिरूर तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप बापू नागवडे, संचालक हभप रामदास नागवडे, जयवंत तात्या नागवडे (सरचिटणीस, राष्ट्रवादी – शरद पवार गट), सचिन नागवडे (संचालक, बाभुळसर विका), युवा कार्यकर्ते सोमनाथ नागवडे, नानासो नागवडे, हभप मुरलीधर भोसले, बाळासाहेब थोरात, ग्रामसेवक यु. डी. गायकवाड, संगणक परिचालक अमित नागवडे, शिपाई भंडलकर, मुख्याध्यापक चौधर सर, कोथिंबीरे सर, प्रतिभा म्हस्के, मीना माने यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
स्वच्छता अभियान व चावडी वाचन उपक्रम
या विशेष दिवशी गावातील नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी गावातील विविध भाग स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करत प्रत्यक्ष भाग घेतला.
तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये “चावडी वाचन” उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी शासनाच्या माहितीपत्रकाचे सार्वजनिक वाचन केले. हा उपक्रम लोकशाही, शासन व्यवस्था आणि नागरिकांचे हक्क यांची जाणीव निर्माण करणारा ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्साही वातावरणात पार पडले, तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक यु. डी. गायकवाड यांनी केले.
हा कार्यक्रम गावच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरला असून, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये अभिमानाची आणि एकजुटीची भावना अधिक दृढ झाली आहे.