January 19, 2026 1:55 am

शालेय जीवनामध्ये सुंदर हस्ताक्षर महत्त्वपूर्ण : राहुल चातुर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हस्ताक्षर स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण

शालेय जीवनामध्ये सुंदर हस्ताक्षर महत्त्वपूर्ण : राहुल चातुर
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हस्ताक्षर स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण

शिरूर (प्रतिनिधी):

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरण्यासाठी सुंदर हस्ताक्षर हा एक महत्त्वाचा घटक आहे. सुंदर हस्ताक्षर केवळ आकर्षक दिसण्यासाठी नसून, केंद्रीय प्रशासकीय परीक्षांसारख्या दीर्घ स्वरूपातील उत्तरांच्या मूल्यांकनामध्येही ते निर्णायक ठरते. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असते, असे मत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे शिरूर शाखाध्यक्ष राहुल चातुर यांनी व्यक्त केले.

ते खेडकर मळा, खंडाळे, पऱ्हाडवाडी, केंदुर, कमेवाडी (ता. शिरूर) येथे आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलत होते. या वेळी गावातील विविध शाळांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल नरवडे, खंडाळे ग्रामपंचायतीच्या सदस्य शुभदा नरवडे, कमेवाडी शाळा समितीच्या अध्यक्षा सुनिता भुजबळ, तसेच अमोल भुजबळ, कल्पेश भुजबळ, संदीप ढमढरे, स्नेहल गळंगे, स्नेहल चव्हाण, संतोष सातपुते, निलेश ढमढेरे, राहुल नरके, मोहिनी भुजबळ, सुप्रिया दरवडे, मंगेश भुजबळ, मंदार रघुनाथ पऱ्हाड, श्रिकांत पऱ्हाड, गणेश थिटे, लालुभाई मुलाणी, सुभाष गावडे, अरुण पऱ्हाड, मंगेश पऱ्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्गाचे योगदान:
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक बाबासाहेब शेरकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बाळासाहेब रसाळ, वैशाली थिटे, बबिता जाधव, सतीश ढेकणे, मनीषा साकोरे नळकांडे मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

अभिनंदन आणि प्रोत्साहन:
स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिरूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विवेकानंद फंड यांनी अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें