शिरूर तालुक्यात आई व सहा वर्षीय मुलगा बेपत्ता; पोलीसांकडे तक्रार दाखल
प्रतिनिधी – शिरूर
शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावामधून एक महिला आणि तिचा सहा वर्षीय मुलगा अचानकपणे बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
मिसिंगची नोंद क्रमांक 67/2025 प्रमाणे, गणेश बबन सावंत (वय 28 वर्षे, व्यवसाय मजुरी, सध्या रा. शिंदोडी, मुळगाव – लिंगी पिंपळगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी वैशाली गणेश सावंत (वय 25 वर्षे) व मुलगा विराज गणेश सावंत (वय 6 वर्षे) हे दोघेही 28 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजल्याच्या सुमारास घरातून कोणालाही काहीएक न सांगता निघून गेले आहेत. यानंतर दोघांचाही कोणताही संपर्क झालेला नाही.
बेपत्ता झालेल्या वैशाली गणेश सावंत यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे – रंग सावळा, उंची 5 फूट, अंगात हिरव्या रंगाची पांढऱ्या नक्षीची साडी, त्यावर काळे जाकीट, लांब काळे केस, कानात फुलांची कुडी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर गोंदलेले टिळक, पायात चांदीची पैंजण व चॉकलेटी रंगाच्या चपला. त्या मराठी भाषा बोलतात.
मुलगा विराज गणेश सावंत याचा रंग सावळा असून उंची सुमारे 3 फूट आहे. अंगात पांढरा शर्ट व काळी पँट, डोक्यावर काळे केस व पायात काळ्या रंगाची सँडल आहे. तोही मराठी भाषा बोलतो.
या घटनेची नोंद पोलीस अंमलदार खेडकर (बॅज नं. 2592) यांनी घेतली असून तपास पोलीस अंमलदार टेंगले (बॅज नं. 2499) हे प्रकरणाचा तपास करत आहेत. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबवली जात आहे.
या घटनेची नोंद एन्ट्री क्रमांक 90/2025 म्हणून झाली आहे. या दोघांचा कुठेही थांगपत्ता न लागल्यामुळे कुटुंबीय चिंतेत असून नागरिकांनी ९५७९८३८३६१, ९६९९२२५७५६, किंवा ९३७०५९११३० या क्रमांकांवर माहिती दिल्यास मदत होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.