रासई देवी चरणी ५१ तोळे चांदीचा हार अर्पण
प्रतिनिधी – विजय कांबळे
नागरगाव (वडगांव रासई) :
शेलार परिवाराचे कुलदैवत तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रासई देवीच्या चरणी लोणावळा येथील शेलार बंधूंनी ५१ तोळे चांदीचा हार अर्पण केला. हा धार्मिक आणि भक्तिभावपूर्ण सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पडला.
लोणावळा येथील दिनेश धोंडीबा शेलार आणि निलेश धोंडीबा शेलार या भावंडांनी देवीच्या चरणी चांदीचा हार तसेच एक ग्रॅम सोनं अर्पण करत विधीवत पूजन करून देवीचे दर्शन घेतले. या भाविकांच्या भक्तीने परिसरात भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
या प्रसंगी वडगांव रासई येथील माजी उपसरपंच रामचंद्र विष्णू शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे शिरूर तालुका उपाध्यक्ष डॉ. सुजित शेलार, नारायण वामन शेलार, डॉ. सायली शेलार, गुरव दादासाहेब शेलार, तसेच अनेक ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रासई देवी हे ठिकाण शेकडो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून, दरवर्षी येथे नवस फेडण्यासाठी हजारो भाविक दाखल होतात. शेलार बंधूंच्या या भक्तिभावपूर्ण अर्पणामुळे परिसरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण झालं असून, देवीच्या कृपेची भावना सर्वत्र दिसून आली.