शिरूर तालुक्यात पुलाच्या कामाचे साहित्य चोरीला; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
शिरूर (ता. शिरूर) – शिरूर तालुक्यात पुलाच्या कामाचे साहित् चोरीला; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल हद्दीत घोड नदीच्या काठावर सुरू असलेल्या रस्त्याच्या पुलाच्या कामासाठी लागणारे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अजित बाळू येवले (वय २५ वर्षे, व्यवसाय – स्ट्रक्चर इंजिनियर, रा. रेनवडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 331(4) आणि 305 अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.३० वाजल्यापासून ते २६ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३.०० वाजेपर्यंतच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी कवठे यमाई गावाजवळील घोड नदीच्या काठावर असलेल्या पाटबंधारे विभागाच्या बंद खोलीचे आणि पत्र्याच्या शेडचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडले. त्यानंतर त्यांनी आत प्रवेश करून तसेच मोकळ्या जागेतून रस्त्याच्या पुलाच्या कामासाठी लागणारे साहित्य चोरून नेले. चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे २,५२,५२५ रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे पुलाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस सुभेदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजाळे यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.
पोलीस चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. लवकरच आरोपींचा तपास लावून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.