June 15, 2025 7:14 am

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : परवाना नसताना दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : परवाना नसताना दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

शिरूर, दि. २६ एप्रिल २०२५

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात “हॉटेल रान जत्रा” येथे बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर शिरूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रदीप कुबेर गिरी (वय ४०, रा. रामलिंग रोड, शिरूर) याच्यावर मुंबई दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेचा सविस्तर तपशील:
२६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिस शिपाई अजय हरिश्चंद्र पाटील (ब.नं. ३२८१) हे मांडवगण फराटा येथे गस्त घालत असताना “हॉटेल रान जत्रा” या ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. तातडीने कारवाईस धाव घेतली असता आरोपी प्रदीप गिरी हा आपल्या ताब्यात देशी व विदेशी दारूचा साठा बाळगून विक्री करताना आढळून आला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो घटनास्थळावरून पळून गेला.

जप्त दारूचा तपशील:
पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून एकूण ५,११० रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला आहे. यामध्ये —

पॉवर लाईम पंच कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या ४८ बाटल्या (किंमत ₹३,३६०)

इम्प्रियल ब्लू कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या १० बाटल्या (किंमत ₹८५०)

मॅकडॉल रम कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या ६ बाटल्या (किंमत ₹६००)

ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या २ बाटल्या (किंमत ₹३००)
असा मुद्देमाल समाविष्ट आहे.

पोलिसांची कार्यवाही:
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २८२/२०२५ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार जगताप (ब.नं. २५) यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें