वाघोलीत किडीलॅडस प्री-स्कूलच्या शुभारंभ सोहळ्यास मंत्री भरत गोगावले आणि उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी – शिरूर | दि. २७ एप्रिल २०२५
वाघोली (ता. हवेली, जि. पुणे) येथे किडीलॅडस प्री-स्कूल या आधुनिक शिक्षण संस्थेच्या भव्य शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या प्रसंगी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास महामंडळाचे मंत्री भरत गोगावले आणि विधान परिषद उपसभापती नीलमताई गोऱ्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष सारिकाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असून, या निमित्ताने अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप मंत्री गोगावले आणि नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शुभारंभपूर्वी वाघेश्वर मंदिरात अभिषेक
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, वाघोली येथील श्री वाघेश्वर मंदिरात मंत्री भरत गोगावले आणि उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते भव्य अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. धार्मिक वातावरणात सुरू होणाऱ्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साह आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महाअभिषेकाचा विशेष हेतू
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारिकाताई पवार यांनी आपल्या भावाच्या विजयासाठी आणि कॅबिनेट मंत्रीपदासाठी विशेष संकल्प केला होता. त्याच्या पूर्ततेसाठीच वाघेश्वर मंदिरात हा महाअभिषेक सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
नागरिकांच्या समस्या मंत्री गोगावले यांच्यासमोर
कार्यक्रमाच्या निमित्ताने वाघोलीसह परिसरातील ग्रामीण भागातील समस्या व विविध खात्यांशी संबंधित निवेदने मंत्री गोगावले यांच्याकडे सादर केली जाणार आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आशा व अपेक्षा
किडीलॅडस प्री-स्कूलच्या स्थापनेमुळे वाघोली परिसरातील लहान मुलांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून सामाजिक भानही जपले जात आहे.