मांडवगण फराटा विकास सोसायटीच्या निवडणुकीत वाघेश्वर सहकार पॅनेलचा ऐतिहासिक विजय: १३-० फरकाने दादा फराटे यांचा पराभव
अल्लाउद्दीन अलवी | शिरूर प्रतिनिधी | दि. २७ एप्रिल
मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २०२५ ते २०३० या कार्यकाळासाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत मदनदादा फराटे यांच्या नेतृत्वाखालील श्री वाघेश्वर सहकार विकास पॅनेलने प्रचंड बहुमताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. वाघेश्वर पॅनेलने १३ पैकी सर्व १३ जागांवर विजयी होत १३-० अशी झंझावाती कामगिरी केली. यामुळे दादा पाटील फराटे यांच्या शिवशक्ती सहकार विकास पॅनेलला मोठा धक्का बसला आहे.
निवडणूक प्रक्रिया संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी मा. अरुण साकोरे (सहायक निबंधक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणुकीदरम्यान अतिशय उत्साहाचे वातावरण होते आणि परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:
महादेव फराटे – गोविंद फराटे – शरद चकोर – प्रविण जगताप – .खंडेराव फराटे – पंडित फराटे – संपत फराटे –.राजेंद्र बोत्रे –
विशेष मतदार संघातील विजय:
भटक्या विमुक्त जाती/जमाती व वि.मा.प्र. मतदारसंघ:
शहाजी कोळपे – (विजयी).बाळासाहेब भडांगे – (पराजित)
महिला राखीव मतदारसंघ:
रूपाली फराटे – (विजयी).सीमा फराटे – (विजयी).मिनाक्षी फराटे – (पराजित).शितल फराटे – (पराजित)
इतर मागासवर्गीय मतदारसंघ:
उमाकांत कुंभार – (विजयी).सोमनाथ चौथे – (पराजित)
अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ:
बिभीषण थोरात – (विजयी).हनुमंत राजगुरू – (पराजित)
शिवशक्ती पॅनेलच्या उमेदवार
शरद गायकवाड – राजेंद्र दरेकर – कैलास फराटे – दीपक फराटे – रत्नाकर फराटे – वैभव फराटे –.सुरेश फराटे – चंद्रकांत शितोळे –
विजयानंतर जल्लोष:
विजय घोषित होताच मदनदादा फराटे
यांच्या नेतृत्वाखालील वाघेश्वर पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या यशामध्ये दिपक हराळ, आप्पा हरगुडे, प्रशांत पिसाळ, पोपट हराळ, लहू फराटे साहेब, विजय नागवडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत मा. कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त राखण्यात आला होता, त्यामुळे निवडणूक शांततेत पार पडली.