23 वर्षीय तरुणी बेपत्ता – शिरूर पोलिसांकडे नोंद, नागरिकांना सहकार्याची विनंती
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर (ता.26 एप्रिल 2025): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील एक 23 वर्षीय तरुणी गेल्या 25 एप्रिल 2025 पासून बेपत्ता असून, याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक मानव रजि. नं. 65/2025 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता तरुणीचे नाव वैष्णवी संजय फराटे (वय 23 वर्षे) असून, ती 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मांडवगण फराटा येथील राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. त्यानंतर ती अद्याप घरी परतलेली नाही.
तरुणीचा उंची अंदाजे 5 फूट, रंगाने गोरी असून, ती बेपत्ताच्या वेळी हिरव्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि पायात पांढऱ्या रंगाची सॅंडल परिधान केलेली होती.
या प्रकरणी संजय वसंत फराटे (वय 54 वर्षे, रा. गायकवाड मळा, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी खबर दिली असून, पोलीस स्टेशनमध्ये 26 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1:14 वाजता एन्ट्री क्रमांक 08/2025 नोंदविण्यात आली आहे.
या प्रकरणी ASI कदम हे तपास अधिकारी असून, प्रभारी अधिकारी म्हणून सौ. संदेश केजळे काम पाहत आहेत.
पो.हवा/1898 उबाळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणाला वरील वर्णनाची व्यक्ती आढळल्यास तत्काळ शिरूर पोलीस स्टेशन किंवा खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा – 8307325781