June 15, 2025 8:30 am

शिरूर तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षणाची सोडत उत्साहात पार

शिरूर तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षणाची सोडत उत्साहात पा

 

Llशिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाच्या आरक्षणाची बहुप्रतिक्षित सोडत आज मोठया

उत्साहात पार पडली. तहसिल कार्यालयाच्या सभागृहात पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या सोडतीत विविध राजकीय गटांचे कार्यकर्ते, नागरिक, माजी सरपंच आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोडतीमुळे अनेकांच्या राजकीय आकांक्षा उंचावल्या, तर काहींच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या.

ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवरच्या लोकशाही व्यवस्थेतील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, हे स्पष्ट झाल्याने आता पुढील निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हा सोडत कार्यक्रम प्रांताधिकारी पूनम अहिरे व तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत पार पडला. पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांमार्फत सोडत काढण्यात आली. यावेळी समीक्षा गिरमकर व वरद जाधव या विद्यार्थ्यांनी सोडतीचे कार्य पार पाडले.

आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

सर्वसाधारण महिला प्रवर्ग – ३० ग्रामपंचायती

सर्वसाधारण प्रवर्ग – २९

ओबीसी सर्वसाधारण – १३

ओबीसी महिला – १३

अनुसूचित जाती सर्वसाधारण – ४

अनुसूचित जाती महिला – ४

अनुसूचित जमाती सर्वसाधारण – १

अनुसूचित जमाती महिला – २

प्रमुख आरक्षित ग्रामपंचायती (प्रवर्गानुसार):

अनुसूचित जाती महिला: मुखई, गोलेगाव, वाढु बुद्रुक, जांबूत

अनुसूचित जाती सर्वसाधारण: आमदाबाद, वाजेवाडी, निमगाव म्हाळुंगी, हिवरे

अनुसूचित जमाती महिला: वडगाव रासाई, माळवाडी

अनुसूचित जमाती सर्वसाधारण: कुरुळी

ओबीसी महिला: निमगाव भोगी, रावडेवाडी, निमोणे, नगरगाव, पिंपळसुटी, पिंपळे जगताप, पिंपरी दुमाला, सादलगाव, म्हसे बुद्रुक, शरदवाडी, वाडा पुनर्वसन, चव्हाणवाडी, कर्डे

ओबीसी सर्वसाधारण: वाघाळे, अण्णापूर, खैरेवाडी, पारोडी, खंडाळे, फाकटे, कोळगाव डोळस, मिडगुलवाडी, कवठे येमाई, आंधळगाव, गणेगाव खालसा, कासारी, कान्हूर मेसाई, कारेगाव

सर्वसाधारण महिला: आंबळे, कळवंतवाडी, धानोरे, टाकळी भीमा, आपटी, केंदूर, कोरेगाव भीमा, चिंचोली मोराची, शिंदोडी, उरळगाव, गणेगाव दुमाला, पाबळ, भांबर्डे, बुरुंजवाडी, खैरेनगर, विठ्ठलवाडी, आलेगाव पागा, शिक्रापूर, मोटेवाडी, डिंग्रजवाडी, कोंढापुरी, पिंपरखेड, वरुडे, निमगाव दुडे, निर्वी, बाभूळसर बुद्रुक, तर्डोबाचीवाडी, न्हावरे, दरेकरवाडी, गुनाट

सर्वसाधारण प्रवर्ग: शिरूर ग्रामीण, टाकळी हाजी, रांजणगाव गणपती, मांडवगण फराटा, सणसवाडी, मलठण, इनामगाव, ढोकसांगवी, चिंचणी, काठापूर खुर्द, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, चांडोह, करंदी, रांजणगाव सांडस, तांदळी, कर्डेलवाडी, तळेगाव, सोने सांगवी, दहिवडी, बाभूळसर खुर्द, संविदणे, सरदवाडी, जातेगाव बुद्रुक, धामारी, जातेगाव खुर्द, करंजावणे, पिंपरी खालसा

प्रसंगी उपस्थित मान्यवर:

या सोडत कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे, वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार, माजी सरपंच अरुण घावटे, विठ्ठल घावटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजकीय हालचालींना वेग

आरक्षण घोषित झाल्यानंतर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. गावपातळीवरील नेतृत्वाच्या निवडीसाठी हे आरक्षण निर्णायक ठरणार असून, आगामी निवडणुकीकडे संपूर्ण तालुका आता अधिकच उत्सुकतेने पाहत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें