पंढरपूरमध्ये गोपाळपुरा परिसरात अनोळखी महिलेची उघड वसुली; प्रशासन गप्प!
पंढरपूर, प्रतिनिधी- योगेश दहिफळे
पंढरपूर येथील गोपाळपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक अनोळखी महिला सर्रासपणे लोकांकडून पैशांची सक्तीने वसुली करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या महिलेची दादागिरी इतकी वाढली आहे की, तिने दिवसभर रस्त्यावर उभे राहून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, या सर्व प्रकाराला कोणाचा आशीर्वाद आहे, यामागे नक्की कोण आहे, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
या संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (10 एप्रिल. 2025) असून, या महिलेची वागणूक पाहून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे ‘पंढरपूरसारख्या पवित्र क्षेत्रात जर असे प्रकार घडत असतील, तर महाराष्ट्रातून येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचे काय?’ असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.
स्थानिकांनी असा थेट सवाल उपस्थित केला आहे की, जर गोरगरिबांवर अशा प्रकारचा लुटीचा आणि दहशतीचा प्रकार सर्रास सुरू असेल, तर त्यावर नियंत्रण कुणाचे? पंढरपूरच्या प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे.
या प्रकारामुळे संपूर्ण गोपाळपुरा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक व्यापारी आणि भाविक यामुळे त्रस्त असून, त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
जनतेचा सवाल — ‘व्यक्त व्हा… पंढरपूर प्रशासनाला लाज वाटायला हवी की नाही?’
या संदर्भात प्रशासन काय भूमिका घेते, हा महत्वाचा प्रश्न आहे. अन्यथा, लवकरच हा विषय अधिक गंभीर रूप धारण करू शकतो.