शिरूर तालुक्यात सात जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद; गावकऱ्यांना लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण
शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे एक धक्कादायक घटना घडली असून, रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून गावातील एका कुटुंबावर हल्ला करून त्यांना गंभीर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध भारतीय दंड विधान व शस्त्र कायद्याअंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता रांजणगाव सांडस येथील पाटीलवस्ती ते भीमा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर टोकरवाट येथे घडली. फिर्यादी दशरथ गुलाबराव शितोळे (वय 69, व्यवसाय – शेती, रा. रांजणगाव सांडस) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुढील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
1. सुरेश चंदर रणदिवे
2. मधुकर लक्ष्मण रणदिवे
3. निखिल मधुकर रणदिवे
4. अक्षय मधुकर रणदिवे
5. प्रशांत सुरेश रणदिवे
6. अनिल उर्फ बाबू सुरेश रणदिवे (सर्व रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर)
7. साधना प्रमोदकुमार बोथरा (रा. इगतपुरी, जि. नाशिक)
फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय – संभाजी शितोळे, शशिकला शितोळे, बाळासाहेब शितोळे, स्वामिनाथ शितोळे, तानाजी शितोळे, नंदकुमार शितोळे, शोभा शितोळे – यांना वरील आरोपींनी रस्त्यावर अडवून उस तोडणीसाठी वापरण्यात येणारा कोयता, लोखंडी रॉड व दगडाने जबर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत धमक्या दिल्या. या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबीयांना डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या आहेत.
पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 126(2), 118(1), 189(2), 191(2)(3), 190, 352, 351(2), 125(A), 324(4) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25, 27 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, गुन्ह्याची नोंद 20 एप्रिल 2025 रोजी 00.38 वा. स्टेशन डायरी नंबर 04/25 अशी झाली आहे.
या प्रकरणी पोहवा राऊत (क्र. 3300) यांनी गुन्हा दाखल केला असून, सफौ बनकर हे तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. याप्रकरणी प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.