June 15, 2025 7:34 am

शरदचंद्रजी पवार यांची शिंदेवाडीतील श्री श्री लक्ष्मी तरु ऑक्सिजन पार्कला भेट – कॅन्सरवर प्रभावी असलेल्या औषधी वृक्षाबाबत माहिती घेतली

शरदचंद्रजी पवार यांची शिंदेवाडीतील श्री श्री लक्ष्मी तरु ऑक्सिजन पार्कला भेट – कॅन्सरवर प्रभावी असलेल्या औषधी वृक्षाबाबत माहिती घेतली
नागरगाव | प्रतिनिधी

देशाचे ज्येष्ठ नेते, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी शिंदेवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील आर्ट ऑफ लिविंग आणि शाश्वत विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या श्री श्री लक्ष्मी तरु ऑक्सिजन पार्कला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कॅन्सरवर गुणकारी ठरणाऱ्या लक्ष्मी तरु या औषधी वृक्षांबाबत सविस्तर माहिती घेतली.

लक्ष्मी तरुचे औषधी महत्त्व जाणून घेतले
सुमारे वीस मिनिटे वेळ काढत पवार साहेबांनी लक्ष्मी तरुच्या उपयोगांविषयी सखोल चर्चा केली. कॅन्सर, डायबिटीज, चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया अशा विविध आजारांवरील उपचारामध्ये या झाडाचा उपयोग कसा होतो, याची माहिती त्यांनी घेतली. त्यांनी झाडाच्या फळाची चव देखील अनुभवली व त्यापासून मिळणाऱ्या तेल, औषधी घटक, खत व ऑक्सिजन निर्मितीविषयीचे गुणधर्म समजून घेतले. या झाडाचे आयुष्य ७० वर्षे असून, याची उंची ५० फूट पर्यंत जाते. प्रत्येक झाडापासून दरवर्षी १०० किलो फळांचे उत्पादन मिळते, जे साधारण १५ ते २० हजार रुपयांचे उत्पन्न देते.

शेती, आरोग्य आणि स्वयंपूर्णतेचा आदर्श प्रकल्प

लक्ष्मी तरुच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. या झाडांपासून औषधी तेल, आयुर्वेदिक औषधे, खत यांचे उत्पादन होऊन गाव स्तरावरच उद्योगांची शक्यता निर्माण होऊ शकते. साहेबांनी “गावामध्येच फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी स्थापून उत्पादन प्रक्रिया केल्यास शिंदेवाडी हे गाव देशभरात आदर्श ठरेल,” असे मत व्यक्त केले. श्री प्रभाकर जगताप यांनी यासंदर्भात संपूर्ण प्रकल्प, त्यातील शेतीची पद्धत, वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती पवार साहेबांना दिली.

देशातील सर्वात मोठा प्रकल्प शिंदेवाडीत
शिंदेवाडीमध्ये गायरान व डोंगर भागांवर मोठ्या प्रमाणात लक्ष्मी तरु वृक्ष लागवड करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत आर्ट ऑफ लिविंग व श्री प्रभाकर जगताप यांच्या पुढाकारातून २१ लाख लक्ष्मी तरु झाडे लावण्यात आली आहेत, त्यातील सर्वात मोठा प्रकल्प हा शिंदेवाडी येथे आहे.

कार्यकर्त्याचा वृक्षसेवेत बदललेला प्रवास पाहून समाधान
या भेटीदरम्यान पवार साहेबांनी आपल्यासोबत पूर्वी कार्यरत असलेला कार्यकर्ता आज वृक्ष लागवड व पर्यावरणसेवा करत असल्याचे पाहून अभिमान व्यक्त केला. “कार्यकर्त्यांचा असा सकारात्मक प्रवास समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असेही साहेबांनी नमूद केले.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार अशोक पवार, हवेली तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संदीप बापू गोते पाटील, तसेच अनेक मान्यवर व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लक्ष्मी तरु वृक्षांचे प्रत्यक्ष रोपण देखील करण्यात आले.

हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी तसेच पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने भविष्यातील एक आदर्श आणि स्वयंपूर्ण मॉडेल ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें