म्हसे (संगमवाडी) येथे शेतीसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली – शिरूर पोलिसात गुन्हा दाखल
प्रतिनिधी, शिरूर :
शिरूर तालुक्यातील म्हसे (संगमवाडी) परिसरात घोडनदी पात्रालगत असलेल्या अण्णापुर के.टी. बंधाऱ्याजवळ शेतासाठी वापरात असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 257/2025 अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील :
फिर्यादी पोपट भाऊ खाडे (वय 65 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. म्हसे (संगमवाडी), ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजता त्यांनी अण्णापुर के.टी. बंधाऱ्याजवळ घोडनदी पात्रात आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी टेक्समो कंपनीची 7.5 एच.पी क्षमतेची निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटार चालू केली होती. सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी दिल्यानंतर वीज गेल्याने ते घरी परतले.
त्यावेळी शेजारील शेतकरी संतोष प्रभू खाडे यांची मोटार देखील तेथेच कार्यरत होती. दुसऱ्या दिवशी, 18 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता दोघेही मोटारी सुरू करण्यासाठी नदी पात्रात गेले असता त्यांना त्यांच्या मोटारी त्या ठिकाणी आढळून आल्या नाहीत. मोटारीचे वरील व खालील पाईप तसेच केबल वायर कापलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांनी परिसरात शोधाशोध केली पण मोटारी मिळून आल्या नाहीत.
यावरून दोघांना खात्री पटली की अज्ञात चोरट्यांनी मुददामपणे चोरी केल्याची ही घटना आहे. फिर्यादी पोपट खाडे यांनी याबाबत तातडीने टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार नोंदवली.
चोरीस गेलेली मोटार :
- किंमत : अंदाजे ₹10,000/-
- ब्रँड : टेक्समो कंपनी
- क्षमता : 7.5 एच.पी
- रंग : निळा
पोलिस कारवाई :
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात BNS कलम 303(2), 324(4) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अमलदार : पो.हवा. शिंदे (ब.क्र. 2463)
तपास अधिकारी : पो.हवा. उबाळे (ब.क्र. 1898)
पुढील तपास सुरु असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.