N.S.S.E. परीक्षेत सोहम नागवडे राज्यात बारावा – बाभुळसर बुद्रुकचा गौरव
प्रतिनिधी: अल्लाउद्दीन अलवी | दि. १७ एप्रिल | बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर, जि. पुणे)
बाभुळसर बुद्रुक गावातील डॉ. पद्मश्री अप्पासाहेब पवारx विद्यालयाचा विद्यार्थी सोहम नवनाथ नागवडे याने राष्ट्रीय विज्ञान शोध परीक्षा (N.S.S.E.) मध्ये घवघवीत यश संपादन करत राज्यात बारावा क्रमांक पटकावून संपूर्ण परिसरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातून येणारा सोहम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपले शिक्षण प्रामाणिकपणे सुरू ठेवत होता. अशा परिस्थितीतून पुढे येऊन राज्यस्तरीय परीक्षेत मिळवलेले यश हे केवळ त्याच्या मेहनतीचेच नव्हे, तर शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठबळाचे फलित आहे.
सोहमच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रुक व मांडवगण फराटा या त्रिवेणी संगम परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावागावातून त्याचे स्वागत व सन्मान करण्यात येत आहे.
या विशेष प्रसंगी विद्यालयाच्या वतीने आयोजित अभिनंदन समारंभात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष हनुमंतभाऊ पाटोळे, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा भाजपा श्री. सचिन बापू मचाले, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष अंकुश आबा नागवडे, संत तुकाराम सोसायटीचे चेअरमन मनोहर मचाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ आप्पा नागवडे, पोलीस पाटील मीनाताई पाडळे, पालक व युवा कार्यकर्ते अजित गवळी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार हांडे, ग्रामस्थ महादेव मचाले, गणेश मचाले, दत्तात्रय नागवडे, हनुमंत जगताप, प्रशांत जगताप, तसेच स्वातीताई नागवडे, नेहाताई जगताप, पूजाताई मचाले, दिपालीताई मचाले, अश्विनीताई गवळी आदींचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व मुख्याध्यापक प्रा. जे. डी. पवार सर यांनी सोहमच्या यशामागील सातत्य, चिकाटी आणि विज्ञान विषयातील गती यावर भाष्य केले. शाळेतील सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनीही यावेळी आपला आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही सोहमचा गौरव करत त्याच्या यशाची प्रेरणा घेतली.
सोहम नागवडेच्या या यशामुळे संपूर्ण शाळेचा, गावाचा आणि परीसराचा मान उंचावला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.