लोकशाही दिनानिमित्त “छत्रपती शिवाजी महाराज महानगर समाधान शिबिर अभियान”चे आयोजन
प्रशासकीय विभागांची एकत्रित उपस्थिती – नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निवारण
| शिरूर-हवेली | २१ एप्रिल २०२५
१०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत “लोकशाही दिन” निमित्ताने “छत्रपती शिवाजी महाराज महानगर समाधान शिबिर अभियान” दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर व हवेली तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
पहिले समाधान शिबिर सकाळी १० वाजता कन्यादान पॅलेस कार्यालय, शिरूर-चौफुला रस्ता, आलेगाव पागाफाटा (त. शिरूर, जि. पुणे) येथे होणार आहे. त्यानंतर दुसरे शिबिर विठ्ठल रुख्मिणी मंदिर, पेरणे, ता. हवेली, जि. पुणे येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
या शिबिरांमध्ये सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असून, संबंधित विभागांतर्गत नागरिकांच्या समस्या थेट ऐकून तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामध्ये महसूल, पंचायत राज, आरोग्य, शिक्षण, कृषी, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण, समाज कल्याण इत्यादी विभागांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार व मराठी भाषा समितीचे सदस्य जानेश्वर माऊली आबा कडकडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या विभागाशी संबंधित प्रश्न व समस्या घेऊन वेळेवर उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा.