महिती अधिकार कार्यकर्त्यांच्या संघटनेमार्फत ग्रामपातळीवर जनजागृतीसाठी उपक्रम राबविण्याचा निर्धार
प्रतिनिधी, कातळवेढा – अहमदनगर |
“महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ” या राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने कातळवेढा (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील ग्रामसेवक यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून ग्रामपातळीवरील माहिती अधिकार जनजागृती आणि विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
गणेश नामदेव वाघ यांनी सादर केलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित ग्रामपंचायतीमध्ये अनेक योजना, आराखडे आणि प्रकल्प नागरिकांना माहिती न देता किंवा त्यांचा लाभ न देता अंमलात आणले जात आहेत. त्यामुळे माहिती अधिकाराच्या माध्यमातून ग्रामविकास योजनांची पारदर्शकता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
निवेदनात खालील गोष्टींवर विशेष भर देण्यात आला आहे:
- मागील तीन वर्षातील विकास कामांची माहिती (जसे की खड्डे बुजवणे, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा इ.),
- विविध खात्यांतील निधीचा वापर, निविदा प्रक्रिया आणि त्यात पारदर्शकता,
- प्रत्येक प्रकल्पाचे फोटो, प्रत्यक्ष खर्चाचे तपशील,
- जल जीवन मिशन, अमृत योजना, गटआर योजना यांची कार्यवाही व त्यावर खर्च झालेली रक्कम,
- कामांची सद्यस्थिती आणि त्यासंबंधित प्रत्यक्ष पाहणीचे महत्त्व,
- ग्रामविकास योजनेअंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम,
- शाळा व शिक्षण क्षेत्रातील खर्च आणि सुविधा,
- शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांची यादी व निकष.
महासंघाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की, वरील सर्व माहिती ग्रामपंचायतीने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. यासोबतच या सर्व माहितीची संपूर्ण फोटोकॉपी प्रत देखील उपलब्ध करून द्यावी, अशीही नम्र विनंती करण्यात आली आहे.
कार्यकर्ते वाघ यांचे म्हणणे आहे की, ग्रामस्तरावर माहिती अधिकाराचा प्रभावी वापर झाल्यास, शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचतील. त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थाने जागरूक राहून अधिकारांचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे