बाभुळसर बुद्रुक येथे खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित व्हा. चेअरमन बाळासाहेब नागवडे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
प्रतिनिधी: अल्लाउद्दीन अलवी | दिनांक: १६ एप्रिल | ठिकाण: बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे
शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित व्हा. चेअरमन मा. श्री. बाळासाहेब नागवडे यांचा सन्मान सोहळा बाभुळसर बुद्रुक येथील संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्या वतीने अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मा. मनोहर संभाजी मचाले व उपाध्यक्ष मा. हनुमंत भाऊ पाटोळे यांनी उपस्थित राहून सन्मानचिन्ह देऊन बाळासाहेब नागवडे यांचा सत्कार केला.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये दिलीप नागवडे (अध्यक्ष, वारकरी सेवा संघ), संतोष नागवडे (अध्यक्ष, भीमा-घोड ऍग्रो कंपनी), राजेंद्र पाडळे पाटील (उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), अल्लाउद्दीन अलवी (मा. व्हा. चेअरमन व संचालक, संत तुकाराम सोसायटी), शिवाजी नागवडे (मा. संचालक), जालिंदर नागवडे (मा. चेअरमन, श्री दत्त पतसंस्था), शरद नागवडे, दत्तात्रय नागवडे मुंबईकर, भाऊसाहेब माने (मा. सरपंच), तसेच पत्रकार गवळी साहेब (पुण्यनगरी), कुसेकर (सकाळ), सहाय्यक सचिव सौरभ नागवडे, मदतनीस जाकीर सय्यद व इतर अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना बाळासाहेब नागवडे यांनी संस्थेच्या उभारणीत स्वर्गीय तुकाराम बाबा नागवडे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांनी स्व. अर्जुन तात्या नागवडे, स्व. व्यंकट बापू नागवडे, स्व. ज्ञानदेव मचाले, स्व. रामराव नागवडे, स्व. भुजंगराव मचाले, मा. मोहनराव ढमढेरे, डॉ. नानासाहेब नागवडे, पोपट दादासाहेब नागवडे आणि इतर ज्येष्ठ संचालकांचा उल्लेख करत संस्थेच्या सुदृढ वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, संस्थेने नेहमी सभासदांच्या हितासाठी काम केले असून आज संस्थेची आर्थिक उलाढाल तीन ते साडेतीन कोटी रुपयांच्या घरात आहे. सभासद देखील प्रामाणिकपणे संस्थेच्या वसुलीला साथ देतात.
तसेच, त्यांनी नमूद केले की, स्व. अर्जुन तात्या नागवडे यांच्या पश्चात त्यांना शिरूर तालुका खरेदी विक्री संघात प्रतिनिधी म्हणून पाठवले गेले आणि हनुमंत भाऊ पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यंदाची निवडणूक लढवली आणि विजय संपादन केला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिलीप बापू नागवडे यांनी केले, सूत्रसंचालन संचालक अल्लाउद्दीन अलवी यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक सचिव सौरभ नागवडे यांनी केले. कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात आणि एकात्मतेने संपन्न झाला