June 15, 2025 8:28 am

नागरगाव ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; बहुउद्देशीय युवा प्रतिष्ठानकडून संविधान दिन साजरा करण्याची मागणी

नागरगाव ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; बहुउद्देशीय युवा प्रतिष्ठानकडून संविधान दिन साजरा करण्याची मागणी

न्हावरे (प्रतिनिधी – राजेंद्र खोमणे): नागरगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय युवा प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात २६ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व संविधान दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. जयश्रीताई रणदिवे आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अनिल शेलार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले. नितीन डिखळे व विजय कांबळे यांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमात माजी सरपंच हरिभाऊ शेलार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, “भारतीय राज्यघटना ही सर्वसमावेशक असून, ती सर्व नागरिकांना समान हक्क बहाल करते. आंबेडकरांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करणारे विचार दिले आहेत. जगातील १५२ देशांमध्ये त्यांची जयंती साजरी होणे ही त्यांच्या विचारसंपत्तीची जागतिक पातळीवरील पोच दर्शवते.”

माजी सरपंच भाऊसाहेब साठे यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. त्यांनी संविधान दिनाच्या आयोजनाची गरज अधोरेखित करत त्याचा ग्रामीण स्तरावर प्रचार-प्रसार होण्याचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमास उपसरपंच शरद नाना चव्हाण, माजी उपसरपंच अर्चनाताई चांगदेव वाघमोडे, सगण नारनोर, शरद अण्णा साठे, कमलाकर साठे, विलास नाना शेलार, आर्जून नारनोर, चांगदेव वाघमोडे, ग्रामसेविका अनिताताई कदम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

युवा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष आनंदा पाडळे, सचिव सुधीर डिखळे, नितीन डिखळे, सागर कांबळे, प्रदीप कांबळे, लहुकुमार पाडळे, सुनील कांबळे, किरण डिखळे, तेजस डिखळे, ओंकार डिखळे, मयूर डिखळे, अविनाश डिखळे, सचिन कांबळे, गोरख साळवे, संपत कांबळे, गणू गावडे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अखेरीस बहुउद्देशीय युवा प्रतिष्ठानच्या वतीने एक निवेदन ग्रामपंचायतीकडे सादर करण्यात आले. या निवेदनात २६ जानेवारी रोजी शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करणे, तसेच संविधान दिन नागरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने साजरा करावा अशी मागणी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार करून लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुकुमार पाडळे यांनी तर आभार प्रदर्शन विजय कांबळे यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें