बाभुळसर बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी
अल्लाउद्दीन अलवी, बाभुळसर प्रतिनिधी, ता. १४
बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर, जि. पुणे) येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात व श्रध्देने साजरी करण्यात आली. “समता, विषमता आणि विश्वबंधुत्व” या त्रिसूत्रीवर आधारित लोकशाही मूल्यांचा प्रसार करणाऱ्या या महामानवाच्या स्मृती जागवण्यासाठी गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत बाबासाहेबांच्या पुतळ्याचे गावात आगमन झाले. विशेष म्हणजे, तीन फूट उंच बाबासाहेबांचा पुतळा भीमा घोड अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष नारायण नागवडे यांनी सिद्धार्थ तरुण मंडळास भेट म्हणून दिला होता. या पुतळ्याची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दिपालीताई नागवडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन व विद्यमान वहा चेअरमन बाळासाहेब अर्जुनराव नागवडे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली, त्यामध्ये:
रामचंद्र नागवडे (मा. संचालक, घोडगंगा साखर कारखाना)
गणेश मचाले (माजी सरपंच)
अरुण दादा नागवडे (तंटामुक्ती अध्यक्ष)
मोहिनी रणदिवे (उपसरपंच)
नंदा कांबळे (माजी सरपंच)
संतोष काका नागवडे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष)
महेंद्र नागवडे (मा. उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती)
सचिन बापू मचाले (जिल्हाध्यक्ष, किसान मोर्चा, भाजप)
दिलीप बापू नागवडे (अध्यक्ष, वारकरी सेवा संघ, शिरूर)
किशोर नागवडे (अध्यक्ष, श्रीराम विकास सोसायटी)
मनोज मचाले (अध्यक्ष, संत तुकाराम विकास सोसायटी)
रणजीत पाडळे (पोलीस पाटील)
भाऊसाहेब माने, शिवाजी नागवडे, रामभाऊ माने (मा. सरपंचगण)
अल्लाउद्दीन अलवी (संचालक, संत तुकाराम सोसायटी)
ग्रामसेवक यु. डी. गायकवाड, संगणक परिचालक अमित नागवडे आदींचा समावेश होता.
यानंतर भीमनगर येथे धम्मपूजा पार पडली. महिलांनीही या पूजेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अखेरीस संतोष काका नागवडे यांचा सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने बाबासाहेबांची मूर्ती भेट दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत पाडळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेंद्र रणदिवे सर यांनी मानले.