नागरगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार
तीन दिवसांचा कार्यक्रम; मोटारसायकल रॅलीपासून समाजप्रबोधन व्याख्यानांपर्यंत भरगच्च आयोजन
विजय कांबळे – प्रतिनिधी
नागरगाव – भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागरगाव येथे दिनांक १४ ते १६ मार्च २०२५ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण गावामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जयंतीनिमित्त सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय युवा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने तीन दिवसांचा भव्य कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
सोमवार, १४ मार्च २०२५:
सकाळी १० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, गावातून एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जाईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता नागरगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
मंगळवार, १५ मार्च २०२५:
सायंकाळी ६ वाजता सामाजिक विचारांची देवाणघेवाण आणि प्रेरणादायी मनोगते व भाषणांचे सत्र होणार आहे. यानंतर सायंकाळी ७ ते ९ दरम्यान समाज प्रबोधनकार युवा व्याख्याते जितेंद्र दादा आसोले यांचे विशेष व्याख्यान होणार असून, त्यातून युवा वर्गाला दिशा मिळणार आहे.
बुधवार, १६ मार्च २०२५:
शेवटच्या दिवशी सायंकाळी ६ ते ११ या वेळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोल-ताशा, लेझीम, बँड पथकांसह ही मिरवणूक संपूर्ण गावातून फेरी मारणार असून, उत्सवाचा कळसाध्याय ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रमुख अध्यक्ष विजय कांबळे आणि उपाध्यक्ष नितीन डिखळे यांनी सर्व नागरगावकरांना आवाहन केले आहे की, “या प्रेरणादायी कार्यक्रमात सामील होऊन सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवावे.”
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय युवा प्रतिष्ठान च्या पुढाकाराने होत असून, अध्यक्ष आनंदा पाडळे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, सचिव सुधीर डिखळे, तसेच प्रमुख कार्यकर्ते प्रदीप कांबळे, सागर कांबळे, हनुमंत डिखळे, तेजस डिखळे, लहू कुमार पाडळे, नंदकुमार कांबळे, मयूर डिखळे, अविनाश डिखळे, बापू डिखळे, अमोल डिखळे, विशाल डिखळे, प्रफुल्ल डिखळे, दादा साळवे, सुनील कांबळे, विशाल भालेराव, सूरज शिंदे, लखन कांबळे, भाऊसाहेब हराळे, नितीन कांबळे, सिद्धार्थ कांबळे, सचिन कांबळे, किरण डिखळे, सार्थक डिखळे, दत्तात्रय माने, सुनील जोगदंड आणि अनेक कार्यकर्त्यांचे योगदान लाभले आहे.