June 15, 2025 8:19 am

आई-मुलीवर एकाच वेळी अमानुष मारहाण; ५ लाख रुपये मागणीची धमकी, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

आई-मुलीवर एकाच वेळी अमानुष मारहाण; ५ लाख रुपये मागणीची धमकी, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे

पाचर्णे मळा येथे एका तरुणी व तिच्या आईवर एकाच वेळी हल्ला करून मारहाण करत त्यांच्यावर अज्ञात रसायन फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी श्रद्धा भगत भोसले (वय २२, व्यवसाय – गृहीणी, रा. वात्सल्य हॉस्पिटलजवळ, गोलेगाव रोड, शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ९ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता पाचर्णे मळा, शिरूर येथे त्यांची आई निना भगत भोसले यांना घरगुती वादातून आरोपी रवि अर्पक भोसले, यश रवि भोसले, कुणाल रवि भोसले व शर्मिला (पूर्ण नाव माहिती नाही) या चौघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. “तुझ्या नवऱ्याला पाच लाख रुपये द्यायला लाव, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देत त्यांनी जबरदस्ती केली.

या प्रसंगी श्रद्धा भोसले यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. आरोपींनी त्यांच्या अंगावर अज्ञात औषध फेकले व काठीने बरगडीवर मारून दुखापत केली. नंतर हे चौघे धमकी देत घटनास्थळावरून पळून गेले.

शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.सं. 244/2025 अन्वये भा.दं.वि. कलम 118(1), 115(2), 125, तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पो.हवा./2463 बनकर करत असून, प्रभारी अधिकारी पोनि संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.

या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर प्रशासनाने अधिक कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें