शिरूरमध्ये बनावट FD व इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली 21.45 लाखांची फसवणूक; विकास बेलदारविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर (ता. पुणे) – शिरूर येथील एका गृहिणीला एफ.डी. आणि नवीन इन्शुरन्स पॉलिसीचे आमिष दाखवून तब्बल 21 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात विकास गुलाब बेलदार (रा. लक्ष्मीनारायण नगर, चऱोळी, पुणे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद श्रीमती कल्पना अंकुश ढोरमले (वय 50 वर्षे, रा. रामलिंग रोड, ओम रूद्रा कॉलनी, शिरूर) यांनी दिली आहे.
घटना कशी घडली?
सन 2022 पासून डिसेंबर 2024 पर्यंत विकास बेलदार हा इसम स्टेट बँक ऑफ इंडिया, शिरूर शाखेमध्ये SBI लाईफ इन्शुरन्सचे काम पाहत होता. त्याने कल्पना ढोरमले यांना बँकेच्या व्याजदरापेक्षा अधिक व्याज देणाऱ्या एफ.डी. व नवीन पॉलिसी सुरू करून देतो, असे आमिष दाखवले. त्यानुसार विश्वास संपादन करून तिने सहा ब्लँक चेक त्याला स्वहस्ताक्षराने दिले.
परंतु, आरोपीने कोणतीही एफ.डी. किंवा इन्शुरन्स पॉलिसी सुरू न करता खोट्या पावत्या तयार करून पॉलिसी आणि एफ.डी. सुरू झाल्याचा बनाव केला. पुढे त्याने तिच्या खात्यातून (खाते क्र. 35554265989) परस्पर चेक वटवून एकूण 21 लाख 45 हजार रुपये स्वतःच्या खात्यात (खाते क्र. 33881261294) वर्ग करून घेतले आणि तिची फसवणूक केली.
गुन्हा दाखल
ही घटना समोर आल्यानंतर कल्पना ढोरमले यांनी 11 एप्रिल 2025 रोजी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 240/2025 अन्वये भादंवि कलम 418(4)* नुसार आरोपी विकास गुलाब बेलदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास मपो.स.इ. झेंडगे मॅडम करत असून प्रभारी अधिकारी पो.नि. केंजळे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.