June 15, 2025 7:41 am

बाभुळसर बुद्रुकच्या सरपंच दिपालीताई नागवडे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार – विकासकामांचे मोठे योगदान

बाभुळसर बुद्रुकच्या सरपंच दिपालीताई नागवडे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार – विकासकामांचे मोठे योगदान

प्रतिनिधी, नागरगाव :
महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्रापूर येथे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ मध्ये बाभुळसर बुद्रुकच्या सरपंच दिपालीताई महेंद्र नागवडे यांना ‘आदर्श सरपंच’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा पुरस्कार शिक्रापूर येथील मिडास हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमात पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड, कारेगावच्या सरपंच निर्मलाताई नवले, एडवोकेट असूता पारदे, अध्यक्ष अनिलकुमार गीते (युवा उद्योजक), आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराचा गौरव rf दिपालीताई भावुक होत म्हणाल्या,


“सर्वसामान्य गावातील एक महिला सरपंच म्हणून मला या सन्मानाने खूप मोठं समाधान मिळालं आहे. पण माझ्या यशामागे माझ्या पती महेंद्र नागवडे यांचे अथक पाठबळ आहे. अनेक जण म्हणतात की यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, पण माझ्या बाबतीत उलट आहे – माझ्या यशामागे माझ्या पतींचा हात आहे.”

गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय :
दिपालीताई नागवडे यांनी बाभुळसर बुद्रुक सारख्या लहानशा गावात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. गावातील रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून कामे मार्गी लावणे – हे त्यांच्या कारकीर्दीचे विशेष वैशिष्ट्य ठरले आहे.

या यशात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित दादा पवार,तसेच ज्ञानेश्वर माऊली आबा कटके आमदार साहेब. जिल्हा नियोजन समिती सदस्य रवी बापू काळे, लोकनेते दादा पाटील फराटे, राहुल दादा पाचर्णे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि संस्था :
या कार्यक्रमाचे आयोजन रीना ताई सोनवणे आणि तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात मीनाताई सोंडे, संजीवनी वाघमारे, रमाताई आठवले, दीपिकाताई भालेराव, मयूर करंजे पाटील, वंदनाताई भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.i

यावेळी मोतीराम निकुंभ, rमोलाजी भदेकर, गंगाराम गायकवाड तसेच तक्षशिला संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.f

संपूर्ण गावासाठी गौरवाची बाब:
दिपालीताई यांचा सन्मान म्हणजे बाभुळसर बुद्रुकसारख्या गावाचा सन्मान आहे. महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढे येऊन नेतृत्व करावे rr4

Kहा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें