कान्हूर मेसाई येथील विविध विकास सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. भास्कर पुंडे यांची बिनविरोध निवड
कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विविध विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. भास्कर पुंडे यांची बिनविरोध निवड झाली असून, संस्थेच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या नव्या नेतृत्वाकडून ग्रामस्थांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
पूर्वीचे चेअरमन श्री. संजय (काका) पुंडे यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर चेअरमन पद रिक्त झाले होते. यानंतर संस्थेच्या संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेत, संस्थेचे ज्येष्ठ सदस्य श्री. भास्कर पुंडे यांना पूर्ण पाठिंबा देत चेअरमनपदी नियुक्त केले.
या निवडीवेळी संस्थेचे संचालक श्री. संतोष शिंदे, दादासाहेब पुंडे, विकास पुंडे, सुदामभाऊ तळोले, बाळासाहेब घारे, बाजीराव वाघोले, गजानन मोहिते, फक्कडराव पुंडे, सौ. शकुंतला तळोले, सौ. मिडगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित चेअरमन श्री. भास्कर पुंडे यांचा सत्कार करताना ग्रामस्थांनी त्यांच्याकडून अधिक सक्रिय व पारदर्शक कारभाराची अपेक्षा व्यक्त केली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. बबनदादा शिंदे, सुधीर अण्णा पुंडे, पी.एस. पुंडे, मोहनभाऊ पुंडे, बंडूशेठ पुंडे, दादासाहेब खर्डे, बापूसाहेब ननवरे, रामदास पुंडे, कुमार पुंडे, अनिल मिडगुले, अमोल पुंडे, अजित तळोले आदींसह अनेक सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि नियोजनबद्ध पार पडली. सहकार खात्याच्यावतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून श्री. दीपक वराळ यांनी जबाबदारी पार पाडली. सोसायटीचे प्रशासन सचिव श्री. सुखदेव खर्डे, श्री. मोहन तळोले आणि सौ. तृप्ती ननवरे यांनी देखील निवडणूक प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.
श्री. भास्कर पुंडे यांच्या नेतृत्वात विविध विकास सहकारी संस्था नवे यश गाठेल, असा विश्वास ग्रामस्थ आणि सहकारी वर्गाने व्यक्त केला आहे.