बाभुळसर बुद्रुकमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण उत्साहात
अल्लाउद्दीन अलवी, बाभुळसर बुद्रुक प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे रामनवमीपासून सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. गुरुवर्य सिद्ध सद्गुरु शांतीनाथजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि वैकुंठवासी ह भ प सुरेश महाराज साठे यांच्या प्रेरणेने गेली ३३ वर्षे हा सप्ताह अविरतपणे आयोजित केला जातो. संतराज महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प नामदेवदादा साठे महाराज यांचे नेतृत्व आणि ह भ प मुरलीधर महाराज भोसले यांचे व्यासपीठ प्रवचन या सप्ताहाला लाभले आहे.
गावातील भजनी मंडळ प्रमुख रामभाऊ आप्पा नागवडे आणि सर्व भजनी मंडळाच्या सक्रिय सहभागामुळे सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सुरळीतपणे पार पडत आहेत. दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत काकडा भजन, सकाळी ७ ते ११ आणि दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
सप्ताहाची सुरुवात ५ एप्रिल रोजी ह भ प सर्जेराव महाराज काळे यांच्या कीर्तनाने झाली. राम जन्माच्या निमित्ताने ६ एप्रिल रोजी ह भ प लक्ष्मण महाराज निगडे यांचे कीर्तन झाले आणि महादेव मच्छिंद्र नागवडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याच दिवशी सायंकाळी गणेगाव दुमालाचे सरपंच ह भ प तुकाराम निंबाळकर यांचेही कीर्तन झाले. ८ एप्रिल रोजी ह भ प प्रवीण महाराज चौधरी यांनी सुश्राव्य कीर्तन सादर केले.
आज, ९ एप्रिल रोजी सायंकाळी ९ ते ११ या वेळेत अहमदाबाद येथील ह भ प नवनाथ महाराज माशेरे यांचे कीर्तन खंडोबा देवस्थान कमिटी बाभुळसर बुद्रुक यांच्या सौजन्याने होणार आहे. उद्या, १० एप्रिल रोजी ह भ प स्वप्निल महाराज खोरे यांचे कीर्तन राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बाभुळसर बुद्रुक यांच्या वतीने आयोजित केले जाईल. ११ एप्रिल रोजी गुरुवर्य सिद्ध सद्गुरु शांतिनाथजी महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे.
शनिवार, १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संतराज महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प नामदेव दादा महाराज साठे यांचे काल्याचे कीर्तन होईल, अशी माहिती भजनी मंडळाचे सेवेकरी उत्तम नंदू नागवडे यांनी दिली.
या सप्ताहातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुरुवार, ११ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत होणारा भव्य दिंडी सोहळा आणि नगर प्रदक्षिणा.
अखंड हरिनाम सप्ताहामध्ये विविध अन्नदात्यांनी पंगतीसाठी सेवा दिली आहे. बापू शंकर भंडलकर, श्रीरंग सखाराम देशवंत मामा, माधव मच्छिंद्र नागवडे (राम जन्म महाप्रसाद), अशोक राऊत, किरण राऊत, रमेश कल्याण पाटोळे, शहाजी पर्वतराव गवळी, एकनाथ नागवडे, जयसिंग धोंडीबा नागवडे, जयवंत विठोबा नागवडे, शरद भुजंगराव मचाले, रामराव रामराव नागवडे, रामचंद्र बाजीराव नागवडे, विलास भुजंगराव नागवडे आणि भरत नारायण नागवडे यांनी सप्ताहादरम्यान अन्नदान केले. १२ एप्रिल रोजी होणाऱ्या काल्याच्या महाप्रसादाची व्यवस्था समस्त ग्रामस्थ मंडळी बाभुळसर बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आली आहे.
संपूर्ण हरिनाम सप्ताहामध्ये मृदुंगाची साथ ह भ प वाल्मिक महाराज निंबाळकर, शुभम बोरवडे, संजय कुसेकर आणि अशोक गवळी यांनी दिली आहे. गायकवृंदामध्ये ह भ प सर्जेराव फराटे गुरुजी, लक्ष्मण महाराज पवार, वसंत घाडगे, बाबुराव जगताप, अनिल निंबाळकर, नाना बोरुडे, हरी कुदळे, हनुमंत फराटे, विजय नांदखिले आणि जयसिंग नांदखिले यांचा सहभाग आहे. काकडा हरिपाठामध्ये ह भ प उत्तम महाराज ढवळे, बापू भंडलकर, मोहन शेलार, नाना डॉक्टर, बाळासाहेब भानुदास, हनुमंत खंडेराव, बारकू राऊत, सूर्यवंशी, साठे आणि चंद्रकांत खोमणे सहभागी झाले आहेत.
वीणेकरी व्यवस्थापनाची जबाबदारी प्रकाश पाटोळे, विलास नंदू नागवडे, सुनील नागवडे, मच्छिंद्र राऊत आणि अंकुश मचाले यांनी सांभाळली आहे. संपूर्ण सप्ताहातील दुधाची व्यवस्था काशीमाई दूध उत्पादक संस्थेने केली आहे, अशी माहिती भरत मचाले आणि संजय नागवडे यांनी माध्यमांना दिली.
या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.