तर्डोबाचीवाडी येथील जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी: अल्लाउद्दीन अलवी, बाभुळसर बुद्रुक
तर्डोबाचीवाडी येथील स्थानिक शाळेला एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. संत गाडगेबाबा गोरक्षण सेवा संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. फुलसौंदर संगीता मॅडम यांनी केले.
या पुरस्कारासाठी शाळेने केलेली प्रगती ही खरोखरच उल्लेखनीय आहे. लोकसहभागातून आय.टी. कंपनीच्या मदतीने उभी केलेली नवी इमारत, कैलास सत्यार्थ फाऊंडेशनकडून मिळालेले ई-लर्निंग साहित्य, कल्याणी कंपनीकडून मिळालेली स्मार्ट टीव्ही सुविधा, सुशोभीकरण केलेल्या वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी फिल्टर पाण्याची सुविधा, विद्यार्थी शिस्त व शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य इत्यादी बाबींची दखल घेत या शाळेस आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा गौरव शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. फुलसौंदर संगीता तुळशीदास यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष मा. श्री मोहनराव शेलार आणि उपाध्यक्ष मा. श्री महेश दळवी यांनी शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी उपशिक्षिका श्रीम. वैशाली शेंडगे आणि श्रीम. जयश्री चंदन उपस्थित होत्या.
या सोहळ्यात इतर मान्यवरांनाही विविध क्षेत्रातील आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये आदर्श कीर्तनकार सुरेश महाराज फराटे, आदर्श डॉक्टर भानूदास फराटे, आदर्श शेतकरी विजय चव्हाण, आदर्श शिक्षक संदिप रासकर, आदर्श शिक्षिका श्रीम. मेहेर मनिषा आणि आदर्श वाहनचालक नाना कदम यांचा समावेश होता.
कार्यक्रमात शिरूर नगरीचे नगरसेवक मा. नितीनदादा पाचर्णे, आदर्श सरपंच जगदीशदादा पाचर्णे, प्रगतशील शेतकरी जयराम फराटे, माजी सरपंच वर्षाताई काळे, ह.भ.प. गोपीनाथ महाराज पोटावळे, कृषी बाजार समिती संचालक महेंद्र पाचर्णे, उपसरपंच लक्ष्मण कर्डिले आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास मेजर पाटीलबा पाचर्णे, अमोल देवकाते, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश दादा सटाले, नवनाथ पाचर्णे, विवेकदादा पाडळे, माणिक गावडे, सतीश पवार, उज्ज्वलाताई पाचर्णे, सोनालीताई पाचर्णे, सविता देवकाते, पूजा पाचपुते, कांतीलाल कर्डिले, मिठूशेट गदादे, रेवणनाथ इंगळे, मनिषा देवकाते आणि कैलास सत्यार्थ फाऊंडेशनच्या ललीता पोळ व सागर दांडगे हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप रासकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवशाहीर जालिंदर कुरंदळे यांनी केले. या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात एक सकारात्मक लाट निर्माण झाली असून समाजात चांगल्या कार्याची दखल घेतली जाते याची प्रचिती आली. संस्थेचे अध्यक्ष मोहनराव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकारच्या उपक्रमांनी नवचैतन्य निर्माण होत असल्याचे मत नगरसेवक नितीनदादा पाचर्णे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
हा सन्मान भविष्यातील अनेक शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.