गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई – सराईत गुंडास MPDA अंतर्गत तडीपार
शिरूर – शिरूर शहरात विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये असलेल्या आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुंड इसमाला पुणे ग्रामीण पोलिसांनी MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यांतर्गत तडीपार केले आहे. या वर्षी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
गुंडाच्या कारवायांमुळे शिरूर शहर आणि परिसरातील नागरिक त्रस्त होते. त्याने सातत्याने खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या देणे अशा स्वरूपाचे गुन्हे केले होते. त्याच्या विरोधात शिरूर, चांदवड, हडपसर आणि इतर पोलीस ठाण्यांत एकूण ९ गुन्हे दाखल होते.
शिरूर पोलीस निरीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस अधीक्षक सो. पुणे ग्रामीण मा. अंकित गोयल आणि अपर पोलीस अधीक्षक मा. प्रशांत अमले यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी सो. पुणे यांनी गुंडास जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला असून, त्यास अंमलबजावणी करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक फिरोज पठाण, गुन्हे अन्वेषण शाखेचे महेश बक्कर, हवेलीचे श्री. देशमुख, तसेच अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता.
पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितले की, “गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना समाजात थारा नाही. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.” त्यांनी पुढे सांगितले की, अशी कारवाई भविष्यातही सुरूच राहील