शिरूरमध्ये महिला व चार वर्षांचा मुलगा बेपत्ता; अपहरणाची नोंद
शिरूर (जि. पुणे) – शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका महिलेबरोबर तिचा चार वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस तपास सुरु आहे.
सौ. सुजाता योगेश मोटे (वय २८) आणि त्यांचा मुलगा शिवम योगेश मोटे (वय ४), रा. नाथाची वाडी, ता. दौंड, हे ३० मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजता माहेरी जाण्याचे सांगून घरातून निघाले. मात्र, सायंकाळपर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांचे पती योगेश पांडुरंग मोटे (वय ३४) यांनी सर्वत्र शोध घेतला. शोधाशोधीनंतरही त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. यानंतर ३१ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता शिरूर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली.
सौ. सुजाता यांचा वर्णन असा आहे – उंची १५९ से.मी., सडपातळ बांधा, गोरा रंग, काळे केस, सरळ चेहरा, काळे डोळे, अंगात काळसर-जांभळ्या रंगाची साडी. तर, मुलगा शिवम याच्या अंगात निळ्या रंगाचे जॅकेट, पांढरी पँट आणि डाव्या कानात बाळी होती. त्याचे वर्णनही सडपातळ शरीरयष्टी, गोरा रंग, बसके नाक व काळे डोळे असे आहे.
घटना मौजे इनामगाव, ता. शिरूर येथे घडली असून, पोलीस हवालदार २४६३ शिंदे तपास करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या मायलेकांविषयी कोणालाही काही माहिती असल्यास तात्काळ शिरूर पोलीस ठाण्याशी किंवा मोबाईल क्रमांक ९३७०२५२२१० वर संपर्क साधावा.