June 20, 2025 9:57 am

शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सांगता सोहळ्याला खंडाळे येथे शेकडो वारकऱ्यांची उपस्थिती

शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सांगता सोहळ्याला खंडाळे येथे शेकडो वारकऱ्यांची उपस्थिती

खंडाळे (ता. शिरूर) येथील भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था येथे आज शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा सांगता सोहळा कीर्तनसेवेने मोठ्या भक्तिभावात पार पडला. या धार्मिक सोहळ्यासाठी शिरूरसह पारनेर, श्रीगोंदा, दौंड, हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांतील तसेच पंचक्रोशीतील वाघाळे, हिवरे कुंभार, पिंपरी दुमाला, रांजणगाव गणपती येथून आलेल्या शेकडो वारकऱ्यांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी संत एकनाथ महाराजांचे १२वे वंशज ह. भ. प. श्री योगेश महाराज गोसावी (पालखीवाले, पैठणकर) यांचे भावपूर्ण कीर्तन झाले. त्यानंतर उपस्थित वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात समाधानी वातावरणात सोहळ्याचा समारोप साजरा केला.

प्रत्येक वर्षी भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र खंडाळे/रांजणगाव गणपती येथून श्री क्षेत्र पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी (नाथ षष्ठी वारी) शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा १३ दिवसांची पायी वारी करीत असते. या दिंडीचे नेतृत्व ह. भ. प. संतोष महाराज खेडकर करत असतात.

या पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापन, भक्तीभाव, आणि वारकऱ्यांची संख्या पाहून संत एकनाथ महाराज संस्थान, पैठण यांच्या वतीने ह. भ. प. योगेश महाराज गोसावी यांनी भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्थेच्या या पालखी सोहळ्याच्या फडास पैठणच्या षष्ठी वारीतील मानाचे फडकरी म्हणून सन्मानपूर्वक नामांकन करून गौरव केला.

या गौरवामुळे सर्व विश्वस्त मंडळ आणि वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

 

भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था, खंडाळे / रांजणगाव गणपती यांच्या पालखी सोहळ्यास संत एकनाथ महाराज संस्थान, पैठण यांच्यातर्फे “पैठणचे मानाचे फडकरी” म्हणून गौरव.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें