राहुल रणदिवे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड!
शिरूर प्रतिनिधी – विजय कांबळे
रांजणगाव सांडसच्या सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील उदयोन्मुख नेतृत्वाची मोठी निवड, रांजणगाव सांडस: गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पुढाकार घेणारे, लोकप्रिय व कार्यक्षम उपसरपंच राहुल रणदिवे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
रणदिवे हे मा. आमदार माऊली आबा कटके यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांना अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र आमदार माऊली आबा कटके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अण्णा महाडिक, व जिल्हा नियोजन समिती सदस्य रवी बापू काळे यांच्या हस्ते देण्यात आले.
निवडीनंतर रणदिवेंनी काय म्हटलं?
“राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व आमदार माऊली आबा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करीन. ‘घर तेथे कार्यकर्ता, गाव तेथे शाखा’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून पक्षाची विचारधारा, लाडकी बहीण योजना, लाईट बिल माफी, नमो शेतकरी योजना, सौर व कृषी योजना यांचा लाभ तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” असे रणदिवे यांनी नमूद केले.
राहुल रणदिवे यांच्या निवडीमुळे शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे बळ अधिक वाढेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
— आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी एक सक्षम नेतृत्वाची नवी उमेद निर्माण!