शीर्षक: शिरूरमध्ये शासकीय कामात अडथळा; मारहाणीची फिर्याद दाखल
शिरूर (जि. पुणे) – तालुक्यातील रामलिंग रोड येथील श्रीनिवास सोसायटीमध्ये शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याची घटना 2 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:08 वाजता घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद: अंकुश माणिक कुहाडे (वय 41, व्यवसाय – पाणीपुरवठा, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत) यांनी आरोपी अमित जयंत डोंगरे (रा. श्रीनिवास सोसायटी, रामलिंग रोड, शिरूर) विरोधात फिर्याद दिली आहे.
घटनेचा तपशील:
फिर्यादी ग्रामपंचायतच्या वतीने नळ पाणीपुरवठ्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदण्याचे शासकीय काम करत होते. यावेळी आरोपी अमित डोंगरे याने त्याच्या घरासमोर पाइपलाइन बसवली नाही, या कारणावरून कामात अडथळा आणला. फिर्यादी व जेसीबी सुपरवायझर नाथा सुदाम शिंदे यांना दगडाने मारहाण करून दुखापत केली. तसेच सुपरवायझरला जबरदस्तीने उठाबशा काढण्यास लावले व त्यांच्या दुचाकीला (MH 12 CZ 9623) दगडाने ठेचून नुकसान केले.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.न. 222/2025 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 132, 118(1), 125, 352, 351(2)(3), 324(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपास:
सफौ कदम यांच्या नोंदीनंतर पोलीस हवालदार राऊत (3300) तपास करत असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे कार्यरत आहेत.