June 15, 2025 7:47 am

रांजणगावमध्ये गुटखा तस्करी प्रकरण; पोलिसांकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

रांजणगावमध्ये गुटखा तस्करी प्रकरण; पोलिसांकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) – राज्यात प्रतिबंधि असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर रांजणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ९,०९,००० रुपये किमतीचा गुटखा आणि टाटा पंच कंपनीची विना नंबर असलेली कार जप्त केली आहे. या प्रकरणी शेखर भगवान अभंग (वय २५, रा. मंगलमूर्ती शाळेजवळ, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
दि. ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:४५ वाजता अहमदनगर-पुणे हायवेवरील यशवंत चौक, कारेगाव (ता. शिरूर) येथे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बाबासाहेब झेंडे (बक्कल नंबर २८१९) यांनी संशयास्पद कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनचालक पोलिसांना पाहून गाडी सोडून फरार झाला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सापडले.
जप्त मुद्देमाल:
* आर.एम.डी. पान मसाला – ०४ बॉक्स (किंमत ३,६०० रुपये)
* केसर युक्त गोवा १००० – १० पुडे (किंमत अद्याप स्पष्ट नाही)
* विमल पान मसाला – २० पुडे (किंमत २,४०० रुपये)
* सम्राट पान मसाला – २५ पुडे (किंमत ३,००० रुपये)
* टाटा पंच फोर व्हीलर (विना नंबर) – किंमत अंदाजे ९ लाख रुपये
* एकूण जप्त मालाची किंमत: ९,०९,००० रुपये
गुन्हा दाखल व पुढील तपास
महाराष्ट्र राज्यात अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ आणि अन्नसुरक्षा आयुक्तांच्या आदेशानुसार गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर बंदी आहे. तरीही आरोपीने प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची वाहतूक करताना कायद्याचे उल्लंघन केले.
रांजणगाव पोलीस ठाण्यात आरोपी शेखर भगवान अभंग याच्याविरुद्ध कलम २२३ भा.दं.वि. आणि अन्न व सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीची ओळख पटली असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश आगलावे (बक्कल नंबर ११६२) करत आहेत. पोलीस निरीक्षक, रांजणगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें