June 15, 2025 7:54 am

विद्यार्थ्यांनी पालकांसोबत अनुभवली शिवजन्मभूमीची सफर

›विद्यार्थ्यांनी पालकांसोबत अनुभवली शिवजन्मभूमीची सफर

जुन्नर परिसरातील बौद्धकालीन लेण्यांचे घेतले दर्शन

पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथील राज्यस्तरीय उपक्रमशील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत शिवनेरी किल्ला व परिसरातील ऐतिहासिक स्थळांची सफर अनुभवली. या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा, पुरातन वास्तू आणि धार्मिक स्थळांचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.

या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी मंदिर, शिवजन्म स्थळ, प्राचीन वाड्यांचे अवशेष, नगारखाना, पाण्याची साठवण टाके, तटबंदी, टकमक टोक, बुरुज, पुष्करणी, सात दरवाजे, शाही हमाम, अंबरखाना आणि मिनार मशीद यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

पिंपरी दुमाला येथील शाळा दरवर्षी केवळ विद्यार्थ्यांसाठी सहल आयोजित न करता त्यांच्या पालकांसोबत, विशेषत: विद्यार्थ्यांच्या मातांसह ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देते. अशा उपक्रमांमुळे शाळा, शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ यांच्यातील संबंध अधिक दृढ होतात. शालेय विकासासाठी ग्रामस्थांचा आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. ‘स्नेहबंध पालक परिवार सहल’ नावाचा हा उपक्रम यावर्षी यशस्वीपणे पार पडला.

या सहलीत विद्यार्थ्यांनी गिरिजात्मक लेण्याद्री येथील बौद्धकालीन लेण्यांचे तसेच अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री विघ्नहर्ता ओझर येथील गणपतीचे दर्शन घेतले. तसेच पिंपरी दुमाला येथे पांडवकालीन सोमेश्वर मंदिर आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथेही विद्यार्थ्यांनी भेट दिली. पालकांसमवेत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ही सहल निर्धास्तपणे अनुभवली आणि अनेक अमूल्य आठवणी संग्रहीत केल्या.

ही सहल ‘स्नेहबंध पालक परिवार’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या अनोख्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी शाळेचे कौतुक केले आहे.

 

जाहिरात व बातमीसाठी संपर्क करा,,,,,,,

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें