1 एप्रिल 2025 पासून, निष्क्रिय मोबाइल क्रमांक असलेले ग्राहक युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे (UPI) पेमेंट करू शकणार नाहीत. कारण, अशा ग्राहकांचा मोबाइल क्रमांक UPI आयडीवरून अनलिंक केला जाईल.
1 एप्रिलपासून हे बदल देखील लागू होतील
याशिवाय, 1 एप्रिलपासून SBI आणि IDFC फर्स्ट बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड योजनांमध्ये बदल करत आहेत.
UPI सेवेचा नियमित वापर करणाऱ्या ग्राहकांनी आपला बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांक सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. बँक रेकॉर्ड योग्य मोबाइल क्रमांकासह अपडेट ठेवल्यास UPI सेवा सुरळीतपणे सुरू राहील.
SBI सिम्पलीक्लिक कार्ड – स्विगी व्यवहारांवर 10X ऐवजी 5X रिवॉर्ड पॉइंट मिळतील.
एअर इंडिया SBI कार्ड – तिकीट बुकिंगवर 100 रुपयांमागे 15 ऐवजी 5 रिवॉर्ड पॉइंट मिळतील.
मोबाइल क्रमांक सक्रिय ठेवणे आवश्यक
IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड – क्लब विस्तारा मेंबरशिप 31 मार्चपासून उपलब्ध होणार नाही. वार्षिक शुल्क सवलत मिळेल, परंतु प्रवासाशी संबंधित फायदे बंद होणार आहे
यासंदर्भात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन नियमानुसार, जर एखाद्या ग्राहकाचा बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांक दीर्घकाळ निष्क्रिय राहिला, तर संबंधित UPI आयडी अनलिंक केला जाईल, आणि त्या व्यक्तीला UPI सेवा वापरण्यास अडचण येईल.
जर एखादा मोबाइल क्रमांक दीर्घकाळ निष्क्रिय राहिला किंवा पुन्हा नियुक्त केला गेला, तर UPI सेवेत अडथळे येऊ शकतात. दूरसंचार विभागाच्या नियमानुसार, कोणताही मोबाइल क्रमांक 90 दिवसांपर्यंत निष्क्रिय राहिल्यास तो नवीन ग्राहकाला दिला जाऊ शकतो.
