June 15, 2025 7:44 am

बारामतीकरांनो, माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही!” – अजित पवार यांची तोफ

बारामतीकरांनो, माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही!” – अजित पवार यांची तोफ

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना संबोधित करत मोठ्या आत्मविश्वासाने आणि आक्रमक शैलीत भाषण केले.

कॅनलमधून पाणी आणि बंद पाईपलाइनचा मुद्दा

राज्य सरकारने जलसंपत्तीच्या व्यवस्थापनासाठी कॅनलमधून पाणी न देता बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले,

“मी काही गोष्टी सांगत नाही, कारण लगेच टीव्हीवर दाखवल्या जातात आणि त्याचा मला दुसरीकडे त्रास होतो. पण तुम्ही निश्चिंत राहा, जूनपर्यंत तुमच्या कॅनल बंद होणार नाहीत.”

त्याचबरोबर त्यांनी इतर नेत्यांवर निशाणा साधत “बाकीच्या लोकांचा पण विचार करा, दत्तात्रय भरणे यांनी तिकडे हाताला चुना लावत बसायचं का?” असा टोलाही लगावला.

हे सरकार पाच वर्षे चालणार” – अजित पवारांचा दावा

अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे.” त्यांनी सहकार क्षेत्राच्या निर्णयक्षमतेबाबतही ठाम भूमिका घेत,

“सहकार खाते राष्ट्रवादीकडे आहे. मी प्रश्न लवकर सोडवू शकतो, तेवढं कोणीही सोडवू शकत नाही. एक्साईज खातं माझ्याकडे आहे, त्यामुळे काही परवानग्या असतील तर त्या मीच देऊ शकतो.”

त्यांनी स्पष्ट केले की, सरकारच्या धोरणांमुळे काही समस्या येऊ शकतात, पण त्या सोडवण्यासाठी आपली जबाबदारी आहे.

शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका?

अजित पवार यांनी आपल्या भाषणात कुठेही थेट नाव न घेता शरद पवारांवर टीका केली.

“मी माझा 90 चा स्वभाव किती बदलला आहे. आता बदलू नका, नाहीतर अधिकारी ऐकायचं नाहीत, असं लोक म्हणतात. खासदार चुकीचा निवडला तर चार-पाच काम कमी होतील. पण जर विधानसभा आमदार चुकीचा निवडला, तर तुमच्या प्रपंचावर काही परिणाम होणार नाही. मात्र, कारखाना चुकीच्या हातात गेला, तर तुमच्या प्रपंचावर परिणाम होईल.”

“कारखान्याचा इन्कम टॅक्स फक्त अमित भाईमुळे निघाला. 15-20 वर्ष हे चाललं होतं. मग आधीच्या काळात का नाही झालं?” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टोला लगावला.

“बारामतीकरांनो, माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही!”

अजित पवारांनी आपल्या भाषणात बारामतीकरांशी भावनिक संवाद साधला आणि आपली राजकीय ताकद दाखवत मोठा दावा केला.

“मी पाच वर्षांत जर पाच हजार कोटी मंजूर करून आणले नाहीत, तर अजित पवार नाव सांगणार नाही. बारामतीकरांनो, माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही. बाकीच्यांचा घास नाही घास. मला लोकांनी लाखापेक्षा जास्त मतं दिली आहेत.”

तशीच साथ द्या!”

अजित पवार यांनी बारामतीकरांना पुन्हा एकदा आपला पाठिंबा कायम ठेवण्याची विनंती केली.

“मी मोठ्या हॉस्पिटलसाठी काही जागा राज्य सरकारच्या अखत्यारीत आणल्या आहेत. त्या गरिबांसाठीच आहेत. तुम्ही आजपर्यंत मला जशी साथ दिली, तशीच साथ द्या.”

त्यांनी “कारखाना पुढे नेण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या मतांची गरज आहे.” असे सांगत आपल्या भविष्यातील राजकीय भूमिका मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

भविष्यातील राजकीय रणनीतीवर लक्ष

अजित पवार यांचे हे भाषण आगामी राजकीय रणनीतीसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांनी आपल्या कामांची उजळणी करत, स्वतःचा राजकीय अनुभव आणि संपर्क वापरून पुढील काळातही बारामतीच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

यामुळे बारामतीतील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे, तसेच अजित पवारांच्या भाषणाचे भविष्यात काय परिणाम होतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें