June 15, 2025 8:43 am

नागरगावच्या युवकाचा अपघाती मृत्यू – गावात शोककळा,,,,,,

नागरगावच्या युवकाचा अपघाती मृत्यू – गावात शोककळा,,,,,,

शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
नागरगाव : शिरूर-चौफुला महामार्गावर आबळे येथे झालेल्या भीषण अपघातात नागरगाव येथील आदेश बाळासाहेब भोईटे (वय 30) या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू

गुरुवारी सायंकाळी कारेगाव एमआयडीसीतून काम आटोपून परतत असताना आदेश भोईटे यांचा अपघात झाला. आबळे येथील हॉटेल कासारीजवळ टेम्पो आणि त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, आदेश भोईटे यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे नागरगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, तरुणाच्या अकाली जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

आदेश भोईटे यांच्या निधनाने भोईटे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पतीच्या निधनानंतर आई आपल्या मुलांकडेच पाहून जीवन जगत होती. त्यातच तीन मुली आणि एक मुलगा असलेल्या कुटुंबाचा आधार असलेल्या आदेश यांचा अपघात झाल्याने संपूर्ण परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

महामार्गावर पाचव्या तरुणाचा मृत्यू – नागरगावकरांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर-चौफुला महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, ही गेल्या काही वर्षांतील नागरगावमधील पाचवी दुर्दैवी घटना आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने या महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरगाववासीयांकडून होत आहे.

ग्रामस्थांकडून हळहळ

आदेश भोईटे यांच्या अचानक जाण्याने गावातील नागरिक भावूक झाले असून, त्याच्या कुटुंबीयांना ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अंतिम संस्काराला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासन काही पावले उचलणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें