June 15, 2025 7:12 am

विटभट्टी मजुराच्या पुतणीची गळफास घेऊन आत्महत्या

विटभट्टी मजुराच्या पुतणीची गळफास घेऊन आत्महत्या
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर, दि. 24 मार्च 2025 – शहरातील रामलिंगरोड परिसरात आज सकाळी एका 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली गजानन टिपरे (वय 18) ही आपल्या कुटुंबासोबत शिरूर येथे वास्तव्यास होती. तिचे काका राजू रामदास टिपरे आणि कुटुंबीय विटभट्टीवर कामाला गेल्यानंतर ती सकाळी 9:45 च्या सुमारास घरात परतली होती. काही वेळानंतर तिची 9 वर्षीय चुलत बहीण उषा रडत रडत विटभट्टीवर आली आणि “दिदीने घराचा दरवाजा बंद केला असून तो उघडत नाही,” असे सांगितले.

काका राजू टिपरे आणि काकू शीतल यांनी घरी जाऊन दरवाजा ठोठावला, मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला असता अंजलीने लाकडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने तिला ग्रामिण रुग्णालय, शिरूर येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. शिंदे व तपासी अंमलदार पो.हवा. राऊत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें