गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दत्तात्रय निंबाळकर, व्हाईस चेअरमनपदी पंडित बोरावडे यांची बिनविरोध निवड
बाभुळसर बु, ता. २५ (प्रतिनिधी) अल्लाउद्दीन अलवी
गणेगाव दुमाला (ता. शिरूर, जि. पुणे) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी झालेल्या निवडणुकीत दत्तात्रय ज्ञानदेव निंबाळकर यांची चेअरमनपदी तर पंडित गुलाबराव बोरावडे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.
संस्थेचे विद्यमान चेअरमन सुधीर भोसले यांनी दुसऱ्यांना संधी मिळावी म्हणून पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पी. व्ही. हराळसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रक्रियेत एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
या निवडीनंतर तंटामुक्ती अध्यक्ष पोपटभाऊ निंबाळकर पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गणेगावचे सरपंच हभप तुकाराम महाराज निंबाळकर, उपसरपंच रोहिणीताई निंबाळकर, माजी चेअरमन मानसिंग आप्पा शितोळे, तंटामुक्ती उपाध्यक्ष संजय दशरथ कोंडे यांसह ग्रामस्थ व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुजंग निंबाळकर यांनी केले, तर आभार बन्सी जगताप यांनी मानले.