शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने रमजान इफ्तार पार्टीचे आयोजन
संपादक – रमेश बनसोडे
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने आज, दिनांक 23 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:45 वाजता बाजार मस्जिद, शिरूर येथे रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम समाजासाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक, राजकीय, व्यापारी तसेच पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, मौलाना कैसर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, माधव सेनेचे रवींद्र सानप, अल बैतुल माल कमिटीचे फिरोजभाई बागवान, भाजपाचे प्रवीण मुथा, प्रवासी संघाचे अनिल बांडे, बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड, मनसेचे शहराध्यक्ष ॲड. आदित्य मैड, रवि लेंडे, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे, शशिकला काळे, उद्योजिका सविता बोरुडे, खिदमत फाउंडेशनचे मुश्ताक शेख, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड, राजेंद्र खेतमळीस, गोपीनाथ पठारे, फिरोज शिकलगार, शिवाजी औटी तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये जातीय सलोखा टिकवण्यासाठी व परस्परांतील बंधुभाव दृढ करण्याच्या उद्देशाने शिरूर पोलीस स्टेशनतर्फे सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
यावेळी मार्गदर्शन करताना शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले की, “शिरूर शहराच्या शांतता व ऐक्याची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. रमजानचे रोजे सर्वांना शांती आणि मानवतेचा संदेश देतात. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी परस्पर सहकार्याची भावना जोपासावी.”
- या इफ्तार पार्टीमुळे शहरातील सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होईल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.