June 20, 2025 10:07 am

मानवी जीवनातील कला म्हणजे परिसच – माधव राजगुरू

  • मानवी जीवनातील कला म्हणजे परिसच – माधव राजगुरू

  • शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
    रांजणगाव : “मानवी जीवनात जोपासले जाणारे छंद आणि अंगभूत कला या खऱ्या अर्थाने परिसाप्रमाणे असतात. त्यांचा उपयोग करून आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकतो,” असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, पुणेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले.

बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेच्या उद्घाटनानिमित्त रांजणगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या शिरूर शाखेच्या वतीने तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील ७६ शाळांनी सहभाग घेतला होता. विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ यावेळी पार पडला.

बालकुमार साहित्य संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शिरूर शाखेच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती शाखाध्यक्ष राहुल चातुर यांनी दिली.

कार्यक्रमास बालकुमार साहित्य संस्था, पुणेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, ज्येष्ठ समाज प्रबोधनकार उत्तम अण्णा भोंडवे, शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल पलांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरूर अध्यक्ष मनोहर परदेशी, केंद्रस्तरीय सदस्य सचिन बेंडभर, पदवीधर शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्याण कोकाटे, केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे, संचालक रामचंद्र नवले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी स्वरा भुजबळ, आराध्या गावडे, नियती कटारिया, अधिरा शेळके, शौर्य कळसकर, आरुष चव्हाण, आरुष लोखंडे, तेजस्विनी चिकटे, तेजस्विनी शिंदे, स्वरा पवार, सान्वी अडसूळ, शौर्यप्रताप कळसकर, सर्वज्ञ वाळके, अनिष्का पऱ्हाड, स्वरांजली भागवत, रूची निषाद, अन्वी गायकवाड, सृष्टी बोऱ्हाडे, श्रेयश शिंदे, अस्मिता नळकांडे, ईश्वरी उबाळे, सह्याद्री वीर, अदिती गायकवाड, अंबिका पवार, स्वानंद दंडवते, शर्वरी गुंड, प्रगती वानखेडे, देवांशी झांजे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये गडकोट किल्ले संवर्धन व पर्यावरण जतन याबाबत विशेष मोहीम राबवल्याबद्दल शिवदुर्ग प्रेमी प्रतिष्ठान चे संस्थापक उमेश धुमाळ आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षण निर्माण करण्यासाठी लाठी-काठी व योग प्रशिक्षणाचे आयोजन केल्याबद्दल किरण अरगडे यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, शिरूरचे कार्याध्यक्ष कुंडलिक कदम, बालकुमार संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव मांढरे, कार्यवाह विवेकानंद फंड, उपाध्यक्ष गुरुनाथ पाटील, कोषाध्यक्ष संभाजी चौधरी, कार्यकारिणी सदस्य शेखर फराटे, आकाश भोरडे, विठ्ठल वळसे, तानाजी धरणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कवी मनोहर परदेशी आणि बालकवी अनिष्का पऱ्हाड यांनी सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.

युवा उद्योजक आणि कवी मयूर करंजे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें